आधुनिक जग हे ज्ञान आणि माहिती यांचे जग म्हणून ओळखले जाते. यामध्ये ज्ञाननिर्मिती, ज्ञानसंवर्धन आणि ज्ञानप्रसार या तिन्हीं गोष्टींचा समावेश होतो. याचा विचार करून दि. १ डिसेंबर १९८० रोजी मराठी विश्वकोशाच्या संपादन आणि प्रकाशन कार्यार्थ महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची स्थापना करण्यात आली. प्राज्ञ पाठशाळेच्या माध्यमातून संस्कृतचे अध्ययन करणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली. मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून मराठीचा प्रचार व प्रसार करून जिज्ञासू वाचकांना, संशोधकांना, अभ्यासकांना जागतिक दर्जाचे ज्ञान व माहिती उपलब्ध करून देणे हा मराठी विश्वकोशाचा प्रधान हेतू होता.
सीडॅक ने संगणकीकृत केलेले मूळ विश्वकोशाचे २० खंडात विखूरलेले लेख एकत्रीत करून "तांत्रीकदृष्ट्या अद्ययावत" करून "https://vishwakosh.marathi.gov.in/" ह्या संकेतस्थळावर "प्रथमावृत्ती" म्हणून उपलब्ध केले आहेत. युनिकोड वापरून संगणकीकृत केलेला हा डेटा, इमेजेस सहीत ऑनलाइन असून १००% सर्चेबल आहे. पूर्वी केवळ टायटल पुरता मर्यादीत असलेली सर्च आता पूर्ण लेखातील विषय कव्हर करते.
मराठी विश्वकोशाचे नविन अद्ययावत संकेतस्थळ "https://marathivishwakosh.org/" ह्या नावाने असून विश्वकोशाने अंगीकारलेल्या ज्ञानमंडळ संकल्पनेला अनुसरून त्याची रचना आहे.
मराठी विश्वकोशाच्या ऍपमधे दोन्ही साइट एकत्र पहायची सोय आहे. वेगवेगळी अॅप डाऊनलोड करायची गरज नाही. ऍपमधे देखील सर्च वर विशेष भर दिला आहे, जेणेकरून कुणीही हवा तो लेख पटकन शोधू शकेल. ऍपमधूनच मराठी शब्दकोश शोधायची सोय देखील आहे.